प्रतिबिंब तुमच्या अंतरंगाचे

Reflection Foundation

रिफ्लेक्शन फाउंडेशन पुणे ही संस्था आम्ही समुपदेशन क्षेत्रात काम करणाऱ्या समुपदेशकांनी मिळून स्थापन केली आहे. 2014 पासून मानसिक आरोग्य व सामाजिक विषयात काम करताना आलेल्या अनुभवांच्या आधारे मूलभूत व स्थायी कार्य करण्याची आवश्यकता वाटली. संस्थेने विविध शाळांमध्ये, वस्ती पातळीवर, सोसायट्यांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आज पर्यंत घेतलेल्या आहेत. ग्रँविटस फाउंडेशन च्या अंतर्गत आत्तापर्यंत एक हजार अठरा शाळांमध्ये सुरक्षित व असुरक्षित स्पर्श याविषयीच्या कार्यशाळा घेतल्या आहेत व ते काम करताना असे जाणवले की सर्व वयोगटातील मुलं व त्यांचे पालक व शिक्षक यांच्यासाठी समुपदेशन आणि मानसिक आरोग्य संदर्भात काम करणे आवश्यक आहे.

Learn more about Reflection Foundation

संस्थेचा उद्देश

कोणासाठी ?

  • शालेय वयोगटातील विद्यार्थी
  • किशोरवयीन मुली व मुलांसाठी
  • पालकांसाठी 
  • महिलांसाठी 

कोणत्या माध्यमातून ?

  • वैयक्तिक समुपदेशन 
  • कार्यशाळा 
  • शाळांच्या माध्यमातून 
  • थेरेपी

संस्थेचा मुख्य उ‌द्देश हाच आहे, किशोरवयीन वयोगटातील मुलांच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील, यावर निरनिराळे मार्ग शोधणे आणि समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी त्याचा प्रसार करणे.

शालेय वयोगटातील मुलामुलींमध्ये वर्तन समस्या या विषयी काम करणे. किशोरवयातील मुलामुलींमध्ये काम करणा-या लोकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेणे.

किशोरवयीन मुलींसाठी पाळीच्या काळातील शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल या विषयांवर शाळा आणि वस्तीपातळीवर कार्याशाळा घेणे.

किशोरवयातील मुलामुलींसाठी प्रेम, मैत्री आणि आकर्षण या विषयाची कार्यशाळा घेणे.

व्यसनाधीनता या विषयात काम करताना मुलामुलींना सकारात्मक व्यसनांची ओळख करून देणे.

करिअर मार्गदशन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयाच्या कार्याशाळा वस्तीपातळीवर आणि शाळेमध्ये घेणे.

बाल लैंगिक शोषण या विषयातील जाणीव जागृती प्रकल्प सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श या विषयीचे जाणीव जागृती कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये राबविणे,
विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा घेणे.

पालकत्व विषयीच्या कार्यशाळा घेणे.

महिलांसाठी working mother & stress, Superwoman syndrome, Stress management आणि महिला सुरक्षा या विषयी सर्व स्तरातील महिलांसाठी काम करणे.

सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या गरजेनुसार समुपदेशन करणे.


संस्थेकडून घेतल्या जाणा-या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळे व्यासपीठ निर्माण करणे आणि
अभ्यासू वक्ते निर्माण करणे,

संस्थेचे अंतिम उ‌द्दिष्ट म्हणजे वर्तन समस्या, नैराश्य, आणि व्यसनाधीनता, आत्महत्या, मानसिक संतुलन बिघडलेल्या (मॅटल डीसऑर्डर) मुलांच्या साठी, एक मोठे रिहॅबीटेशन सेंटर उभारणे हे आहे. जेणेकरुन त्यांना एकाच ठिकाणी सगळ्या पद्धतीचे उपचार आणि थेरपी मिळू शकतील.

संस्थेचे : प्रकल्प

सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श

बालवाडी ते १ ली, .२ री ते ४थी, ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी या इयत्तांसाठी या विषयाचे वेगवेगळे मॉड्युल्स आहेत.

खेळ गोष्टी यांच्या माध्यमातून सुरक्षित स्पर्श असुरक्षित स्पर्श कसे ओळखावे? सुरक्षा कशी करावी, उपाय योजना या मुद्द्यांवर सेशन घेतले जाते.

व्यसनाधीनता

व्यसन म्हणजे काय?

सवयी आणि व्यासानातील फरक, व्यसनांचे प्रकार, व्यसनांचे दुष्परिणाम (कौटुंबिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक), उपाय योजना.

शोध किशोर मनाचा

इ. ८ वी ते १०वी च्या किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी हे सेशन घेतले जाते. मुला मुलींचे स्वतंत्र सेशन प्रेम, मैत्री आणि आकर्षण या संकल्पनांचे स्पष्टीकरण

आकर्षण व प्रेम ह्यांचे आयुष्यावर होणारे परिणाम ह्याची जाणीव करून देणे

भावनांचे नियमन व व्यवस्थापन कसे करावे, आपले ध्येय निश्चीत करून करियर कडे कसे जावे.

0 +

Total no of students in Manobal till date.

0 +

Scholarships given to students for education and other needs.

0 +

Books distributed to rural and tribal students.

0

Rural libraries set up in Maharashtra.

कार्यक्रम आणि प्रकल्प

वैयक्तिक समुपदेशन

कार्यशाळा

Testimonials

Corporate Patrons

Scroll to Top